SBI ची ‘हर घर लखपती योजना’: दरमहा ₹591 जमा करा आणि मिळवा ₹1 लाख State Bank RD Scheme 2025

State Bank RD Scheme 2025

State Bank RD Scheme 2025 2,500 रुपये गुंतवून मिळवा 1 लाख, काय आहे SBI ची ‘हर घर लखपती’ स्कीम

State Bank RD Scheme 2025 एसबीआय कर्मचाऱ्याने या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. ग्राहकाचा प्रकार आणि मॅच्युरिटी पीरियडनुसार हे व्याजदर वेगवेगळे आहेत.

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने प्रत्येक नागरिकाला लखपती बनवण्यासाठी खास योजना आणलीय. ‘हर घर लखपती’ असं या योजनेचं नाव आहे. या योजनेचा फायदा 18 वर्षांच्या आतील व्यक्तींना देखील घेता येणार आहे.

‘हर घर लखपती’ ही एक रिकरिंग डिपॉझिट्स स्किम आहे. याद्वारे, गुंतवणूकदार दरमहा थोडी बचत करून मोठा निधी साठवू शकतात. या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदा होणार आहे. कारण त्यांना सर्वसामान्य गुंतवणूकदारांपेक्षा अधिक व्याज मिळणार आहे. या योजनेत सामान्य गुंतवणूकदारांना 6.75 टक्के व्याज दिलं जाणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना तब्बल 7.25 टक्के व्याज दिलं जाईल. एसबीआय कर्मचाऱ्याने या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. ग्राहकाचा प्रकार आणि मॅच्युरिटी पीरियडनुसार हे व्याजदर वेगवेगळे आहेत.

एक लाख मिळण्यासाठी किती करावी लागेल बचत?

दर महिन्याला थोडी बचत करून मोठा निधी उभारता यावा, यासाठी एसबीआयने ही योजना आणली आहे. या योजनेतून एखाद्या गुंतवणूकदाराला तीन वर्षांत एक लाख रुपये उभे करायचे असतील, तर त्याला तीन वर्षांसाठी दरमहा 2,500 रुपये योजनेमध्ये गुंतवावे लागतील. त्यानंतर त्याला तीन वर्षानंतर गुंतवणुकीची रक्कम आणि व्याज असे मिळून सुमारे एक लाख रुपये मिळतील.

जाहिरात

तर एखाद्या ग्राहकानं 10 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी निवडला, तर त्याला दरमहा केवळ 591 रुपये गुंतवावे लागतील. या योजनेअंतर्गत अकाउंट उघडताना लागू होणाऱ्या व्याजदराच्या आधारे ग्राहकाने भरायचा मासिक हप्ता ठरवला जाईल. या योजनेअंतर्गत ग्राहक त्यांच्या जवळच्या एसबीआयच्या शाखेत जाऊन अकाउंट उघडू शकतात.

तर, होईल दंड

दर महिन्याला अकाउंटमध्ये जमा होणारा हप्ता उशिरा आल्यास त्यात दंडाची तरतूदही करण्यात आलीय. योजनेअंतर्गत 100 रुपयांवर 1.50 ते 2 रुपये विलंब शुल्क लागू केलं जाऊ शकते. तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने सलग 6 हप्ते भरले नाहीत, तर त्याचे अकाउंट बंद केले जाईल. त्यानंतर जमा केलेली रक्कम त्याच्या बचत अकाउंटवर ट्रान्सफर केली जाईल.

जाहिरात
म्हणून सुरू करण्यात आली योजना

एसबीआयने ही योजना विशेषत: अशा गुंतवणूकदारांना लक्षात घेऊन सुरू केली आहे, जे दरमहा ठराविक रक्कम जमा करून मोठा निधी उभारण्याचा प्लॅन करतात. या आरडी योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 3 ते 10 वर्षे आहे. मॅच्युरिटी पीरियड पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक रक्कम व्याजासह दिली जाते.

10 वर्षांच्या मुलाच्या नावानेही उघडता येईल अकाउंट

जाहिरात
‘हर घर लखपती’ योजनेत अकाउंट उघडण्यासाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत ज्यांना स्वतःची सही करता येते अशी 10 वर्षे व त्याहून अधिक वयाची मुले ते थेट ज्येष्ठांपर्यंत कोणतीही व्यक्ती या अकाउंट उघडू शकते. यात लहान मुलांचे अकाउंट पालकांद्वारे उघडले जाऊ शकते.

 

तुम्ही जर बचत करण्याचा प्लॅन करीत असाल, तर तुमच्यासाठी हर घर लखपती ही योजना उत्तम ऑप्शन आहे. तसेच सरकारी बँक एसबीआयची ही योजना असल्यामुळे पैसे बुडण्याचा धोकाही फार कमी आहे.

 

स्टेट बँकेची दुसरी SBI Patrons ही योजना ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठ सुरु करण्यात आली आहे. ही एक फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे.स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हर घर लखपती योजनेत तुम्ही ३ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करु शकतात.या योजनेत तुम्ही कमीत कमी १ लाख रुपये मिळवू शकतात.या योजनेत जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पैसे जमा केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.या योजनेत तुम्ही नेहमी बदल करु शकत नाही.या योजनेत जर तुम्ही एकदम अॅडव्हान्स पेमेंट केले तर त्याचा परिणाम मॅच्युरिटीवर होऊ शकतो.या योजनेत जर तुम्ही सलग ६ महिने पैसे गुंतवले नाही तर तुमचे बँक खाते बंद होईल. (SBI Har Ghar Lakhpati Yojana)

हर घर लखपती योजनेत तुम्हाला ६.२५ टक्के व्याजदर मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना ७.२५ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.त्यामुळे या योजनेत कमी गुंतवणूकीत तुम्हाला चांगला फायदा होणार आहे.

Leave a Comment